नाणीजधाम फाऊंडेशनबाबत
नाणीजधाम फाउंडेशन ही एक संस्था आहे जीच्या अंतर्गत स्व-स्वरूप संप्रदायाच्या प्रत्येक घटकासाठी, त्यांच्या अध्यात्मिक उन्नतीसाठी डिजिटल साधनांची निर्मिती तसेच उपलब्धता करून दिली जाते.
प पू जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांनी १९९२ पासून ज्या स्वस्वरूप संप्रदायाची सुरुवात झाली. हळूहळू एक एक माणूस जोडला गेला आणि हा भव्य संप्रदाय निर्माण झाला. माणूस म्हणून जन्माला आल्यावर, स्व-स्वरुपाची ओळख करुन घेणे हेच माणसाचे अंतिम ध्येय असावे. मी कोण याची जोपर्यंत आपल्याला जाणीव होत नाही, स्वतःच्या खर्या स्वरुपाची ओळख होत नाही, तोपर्यंत आपला हा मनुष्य जन्म व्यर्थ आहे. हे ज्ञान सुलभ सर्वांना प्राप्त व्हावे हाच प्रयत्न प पू जगद्गुरूश्रींचा राहिला आहे आणि हेच त्यांचे ध्येय आहे.
हे सर्व केवळ अध्यात्मिक साहित्य वाचून शक्य होणारे नाही, त्यासाठी योग्य अश्या सद्गुरुंच्या मार्गदर्शनाची नितांत गरज आहे. त्यांच्याशिवाय या शाश्वत सत्याची प्राप्ती होणे अशक्य आहे.
आताच्या धक्काधक्कीच्या जीवनपद्धतीत माणूस डिजिटल टेक्नॉलॉजीने जगातील अनंत माहितिसंग्रहांशी सहजपणे जोडला गेला आहे. या परिस्थितीत आपल्या सद्गुरुंचे वेळोवेळी लागणारे मार्गदर्शन सहज आणि सुलभपणे लाभावे यासाठी नाणीजधाम फाउंडेशनच्याच अनुषंगाने - साप्ताहिक संतसंग, दैनंदिन अध्यात्मिक शाळा आणि आरती या साधनांची निर्मिती केली गेली. भारताच्या नकाशावर जिथे कुठे स्व स्वरूप संप्रदायाचा भक्त समुदाय आहे तिथे बसून ही भक्ती साधने वापरू शकतो.