आध्यात्मिक कार्य
1. साप्ताहिक संतसंग - सामुदायिक भक्तीतून प्रचंड सात्विक ऊर्जा निर्माण होते याच आधारावर संतसंग या सामुदायिक साधनेची उभारणी झाली. दर रविवारी सर्व भाविक या दिवशी निश्चित स्थळी एकत्रित होऊन संत्संगतून नवविधा भक्तीचा लाभ घेतात.
या कार्यक्रमात प पू जगद्गुरुश्री ऑनलाईन पध्दतीने प्रवचनातून अध्यात्म, संस्कृती व धर्म यावर मार्गदर्शन करत असतात.
॥ जातपात पुछे न कोई, जो हरीभजन गाई, वो हरी का होऐ ॥
याउक्तीप्रमाणे सर्वजण दर आठवड्याला ठरलेल्या ठिकाणी, ठरलेल्या वेळी न चुकता, निमंत्रणाच वाट न पाहता एकत्र येत असतात. यामध्ये आपल्यातील जातीभेद, गरीब, श्रीमंत, धर्मभेद या आणि अश्या सर्व मानवतेला हानीकारक गोष्टी बाजूला सारून लाखो लोक या साधनेचा लाभ घेतात.
2. अध्यात्मिक शाळा - सातत्य जीवनाला शिस्त लावते आणि सोबत चांगल्या गोष्टी बिंबवण्यासाठी, रुजवण्यासाठी अपरिहार्य आहे. म्हणूनच दैनंदिन शाळेच्या माध्यमातून अनेकविध अध्यात्मिक गुण, सात्विकता आणि आदर्श जीवनशैली त्यांच्या भक्त साधक शिष्य यांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न करतात.
म्हणूनच दररोज सकाळी 6 ते 7 यावळेत हजारो भाविक या शाळेत नाणीजधाम फाउंडेशनच्या मदतीने लॉग इन करतात. आणि स्वतः प पू जगद्गुरूश्री या online शाळेच्या स्वरुपातून भाविकांना वेगवेगळ्या अध्यात्मिक विषयांवर मार्गदर्शन करतात.
3. आरती - काही दुर्गम भागांमध्ये साप्ताहिक आरतीचे नियोजन देखील याच माध्यमातून उपलब्ध करून दिले जाते. ज्यामध्ये हजारो भाविक ठरलेल्या वेळी आणि जागी एकत्रित येऊन या साधनेचा लाभ घेतात.